Breaking News

शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमी साता समुद्रापार -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त
शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमी नाव हे साता समुद्रापार पोहचले असून या सुसज्ज अशा मैदानावर नुकतीच साऊथ आफ्रिकेतील संघाविरुद्ध अहमदनगर क्रिकेट संघाचा क्रिकेटचा सामना रंगला. या ठिकाणी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना भेट देत माझ्या गावात क्रिकेटनगरी उभारत आहे. याचा मला अभिमान आहे, असे गौरोगार काढले तसेच खेळाडूंसोबत संवाद साधून
सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले.
क्रिकेट खेळाचा चालना मिळावी तसेच गावातील खेळाडूंमधील गुणकौशल्य वाढावे यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर हे नेहमीच प्रयतक्शील असतात. त्यामुळे त्यांच्या संल्कपनेतून शिवजीनगर येथील मैदानावर मशिवाजी नगर क्रिकेट अ‍ॅकडमी सुरू आहे. या ठिकाणी कोच मनोज लोंखडे आणि दीपक मुरकर यांच्या वतीने क्रिकेटचे प्रशिक्षण देतात. नॅशनल आणि इंटरनॅशनल पातळीवर खेळण्याची खेळाडूंनी संधी निळावी तसेच गावाचे नाव मोठे व्हावे हे उद्धीष्ट समोर ठेऊन या क्रिकेट मैदानावर प्रशिक्षण दिले जाते तसेच देश, विदेश तसेच राज्यातील अनेक प्रोफेशनल अश्या क्रिकेट संघांना या मैदानावर क्रिकेट खेळण्यासाठी आमंत्रित केले जाते. अश्याच प्रकारे शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमीच्या मैदानावर साऊथ आफ्रिका या देशातील क्रिकेट संघाविरुद्ध अहमदनगर मधील क्रिकेट संघाची फ्रेंडली मॅच नुकतीच रंगली.
यामध्ये शिवजीनगर क्रिकेट अकॅमडीच्या देवांश भोईर, पियुप पाटील आणि करण चौधर या खेळाडूंना संधी देण्यात आली होती. तसेच विद्याविहार मधील राजावाडा या क्रिकेट क्लबचे देखील खेळाडू या ठिकाणी क्रिकेट खेळण्यासाठी आले होते. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देऊन शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमीमध्ये क्रिकेट खेळाण्यासाठी मोठी पसंती दिली जात आसल्याबद्दल समाधान व्यक्त केले. या वेळी कोच मनोज लोखंडे, दीपक मुरकर यांच्यासह खेळाडू उपस्थित होते.
शिवाजी नगर क्रिकेट अकादमी मध्ये मनोज लोखंडे आणि दीपक मुरकर हे मुलांना प्रशिक्षण देतातच, पण ग्राउंडची संपूर्ण देखभाल सुध्दा करतात. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या आशीर्वादाने त्यांच्या स्वप्नातल्या क्रिकेट ग्राउंडचे अस्तित्व इथे उभे राहिले असून गावातील मुलांना जिल्हा स्तरीय राज्यस्तरीय आणि देशासाठी खेळण्यासाठी तयार करण्याचा मानस मनोज लोखंडे आणि दीपक मुरकर यांचा आहे.

Check Also

राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेची बुधवारपासून रायगड केंद्राची प्राथमिक फेरी

पनवेल : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी …

Leave a Reply