Breaking News

‘सह्याद्री’तर्फे पूरग्रस्तांना मदत

उरण : प्रतिनिधी, वार्ताहर

पंधरा दिवसांपूर्वी महाड, पोलादपूर, चिपळूणसह अनेक भागात पावसाने पूराच्या रुपाने रौद्र रुप दाखवले. पूर एक दोन दिवसांत ओसरला, पण मागे कायमस्वरूपी कोकणवासियांच्या मनांवर चिखलाचा गाळ साठला. या पूराला आता दोन आठवडे उलटत आल्यानंतरदेखील काही भागांत कोणतीही मदत पोहचली नसल्याचे स्थानिक मित्र परिवार, रहिवाशी यांच्याकडून कळल्यानंतर याच मानवतेच्या सादाला प्रतिसाद देण्यासाठी उरण तालुक्यातील गोवठणे येथील सह्याद्री शैक्षणिक व सामाजिक संस्था पुढे आली.

पूर ओसरल्यापासून मदतकार्य वेगाने सुरू झाले. तातडीने मदत म्हणून उरणमधील विविध सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यावेळी माणूसकीचा हात देण्याचा प्रयत्न करण्यात आला. तरीदेखील या ठिकाणी आणखीन मदतीची गरज असल्याचे कळल्यावर सह्याद्री शैक्षणिक व सामाजिक संस्थेकडून पूरग्रस्त नागरिकांना जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

संस्थेच्या वतीने कांबळेवाडी, मोहोत, खरवली येथील पूरग्रस्तांना मदत करण्यात आली. याप्रसंगी फक्त मदत न करता पिडीतांशी संवाद साधत त्यांना उभारीसाठी धीर दिला. संस्थेचे अध्यक्ष संतोष वर्तक, जेष्ठ सदस्य मच्छिंद्र वर्तक, विजया वर्तक, निर्णय पाटील, अतिश वर्तक, सागर म्हात्रे आणि प्रितम वर्तक यांनी या कामात स्थानिक गावकरी संतोष सोनावळे आणि प्रताप सोनावणे यांच्या उपस्थितीत किटचे व कपड्याचे वाटप केले.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply