Breaking News

शेकापची घटती लोकप्रियता राजेश केणींची खरी पोटदुखी

भाजप नेते राजेंद्र पाटील यांची घणाघाती टीका

पनवेल : रामप्रहर वृत्त
डेरवली येथील भाजपचे कार्यालय हे जुन्या परवानगीनुसार असल्यामुळे भाजप कार्यालयाच्या बांधकामाविषयी जाणीवपूर्वक दिशाहीन आरोप राजेश केणी करत असल्याचे राजेंद्र पाटील यांनी म्हटले आहे.
भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील यांनी सांगितले की, डेरवली येथे सर्वे नं. 45मध्ये भाजपचे जिल्हा कार्यालय बांधण्यात येत आहे. त्याचे एकूण क्षेत्र 24.03 गुंठे आहे. सिडको नैनाच्या मंजूर विकास नियंत्रण नियमावलीनुसार 0.2 बेस एफएसआय अधिक 0.3 एफएसआयचे (अतिरिक्त) शुल्क भरून असे एकूण कमाल म्हणजे जास्तीत जास्त 0.5पर्यंत एफएसआय वापरण्याची तरतूद होती. या तरतुदीप्रमाणे 0.5 इतकाच एफएसआय प्रत्यक्षात या कामासाठी वापरता येणार आहे. याशिवाय हे बांधकाम करण्यासाठी विकास शुल्क म्हणून 47 लाख 40 हजार 316 रुपये, तर लेबर सेस म्हणून चार लाख सहा हजार 894 रुपये आणि स्क्रूटिनी फी 33 हजार 159 असे एकूण 51 लाख 80 हजार 361 रुपये नियमानुसार भरावे लागले आहेत.
विरोधक जी ओरड करत आहेत, ती डेरवली येथील नगररचना परियोजना (टीपीएस)-10 ही योजना जाहीर होण्याआधी सिडकोला बांधकाम परवाना सादर करण्यात आला होता. त्यामुळे टीपी स्कीम (नगररचना परियोजनेतील) 40%-60%चा नियम या बांधकामाला लागू होत नाही. त्याचे काही अंशी तोटे हे कार्यालय बांधताना आम्हाला सोसावे लागले आहेत. टीपीएस-10 शासनाने 5 सप्टेंबर 2023 रोजी मंजूर केली, पण यापूर्वीच या बांधकामाला मंजुरी घेतल्यामुळे इतरांना मिळणारा 2.5 एफएसआय या कार्यालयासाठी वापरता आलेला नाही.
यामुळे जिथे टीपीएस स्कीम मंजूर झाल्यानंतर 2.5 एफएसआय मिळू शकतो तिथे आज केवळ 0.5 एफएसआयने या कार्यालयाचे काम सुरू असून यामध्ये कोणत्याही पद्धतीची गडबड नसून पूर्णपणाने पूर्वीच्या नियमांनुसारच बांधकाम केले जात आहे, मात्र राजेश केणी आज शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस आहेत आणि शेकापच्या नेत्यांनी दुसर्‍याची उणीदुणी काढण्यापेक्षा आधी आपल्या कथित ’राजा’ने कर्नाळा बँकेत 528 कोटी रुपयांचा घोटाळा करून अनेक कुटुंबांना देशोधडीला लावले, त्याकडे लक्ष द्यावे आणि त्या गरीब ठेवीदारांना पैसे कधी परत देणार याबाबत जनतेला माहिती द्यावी, असा टोलाही राजेंद्र पाटील यांनी लगावला आहे.

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply