Breaking News

नळजोडणीधारकांसाठी सुधारित दर

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा

नवी मुंबई क्षेत्रातील सिडकोच्या व्यापारी, सामाजिक व धर्मादाय संस्था तसेच निवासी वापराच्या नळजोडण्यांकरिता आणि सिडकोच्या हेटवणे धरणातून पाणीपुरवठा करण्यात येणार्‍या गावांकरिता फेब्रुवारी-मार्च 2020च्या देयकापासून सुधारित पाणी दर लागू करण्यात येणार आहेत. सिडकोच्या हद्दीतील खारघर, तळोजा, कळंबोली, नावडे, कामोठे, करंजाडे, नवीन पनवेल, काळुंद्रे, द्रोणागिरी या नोडमधील ग्राहकांकरिता तसेच हेटवणे जलवाहिनीवरून पाणीपुरवठा होणार्‍या गावांकरिता हे सुधारित दर लागू असतील.

पाण्याचे सध्याचे व सुधारित दर-वापरावयाचा प्रकार  (कंसात सध्याचे दर (रु.), वाढीव दर (रु.)

जलमापकाद्वारे पाणीपुरवठा होणारे ग्राहक- 1) व्यापारी वापर (35.00 प्रति घ.मी.), 45.00 प्रति घ.मी. 2) सामाजिक व धर्मादाय संस्था- (14.00 प्रति घ.मी.), 18.00 प्रति घ.मी. 3) घरगुती वापर, अ) 20 घ.मी.पर्यंत प्रतिमहा-प्रति कुटुंबाकरिता- (4.75 प्रति घ.मी.), 6.00 प्रति घ.मी., ब) 20 ते 27 घ.मी.पर्यंत प्रतिमहा-प्रति कुटुंबाकरिता (6.00 प्रति घ.मी.), 8.00 प्रति घ.मी. क) 27 ते 36 घ.मी.पर्यंत प्रतिमहा-प्रति कुटुंबाकरिता- (7.00 प्रति घ.मी.), 10.00 प्रति घ.मी. ड) 36 ते 42 घ.मी.पर्यंत प्रतिमहा- प्रति कुटुंबाकरिता- (-) 15.00 प्रति घ.मी., ई) 42 घ.मी.च्यावरील प्रतिमहा-प्रति कुटुंबाकरिता- (-), 20.00 प्रति घ.मी.

घरगुती वापरासाठी आकारण्यात येणारा सरसकट पाणीपट्टी दर- अ) 25 चौ.मी.पर्यंत बांधकाम क्षेत्र (75.00 प्रति महिना) 85.00 प्रति महिना, ब) 25 ते 40 चौ.मी. पर्यंत बांधकाम क्षेत्र- (82.00 प्रति महिना)  95.00 प्रति महिना, क) 40 ते 50 चौ.मी.पर्यंत बांधकाम क्षेत्र- (99.00 प्रति महिना) 110.00 प्रति महिना, ड) 50 ते 60 चौ.मी.पर्यंत बांधकाम क्षेत्र- (120.00 प्रति महिना) 140.00 प्रति महिना, ई) 60 ते 70 चौ.मी.पर्यंत बांधकाम क्षेत्र- (125.00 प्रति महिना) 150.00 प्रति महिना, फ) 70 ते 80 चौ.मी.पर्यंत बांधकाम क्षेत्र- (125.00 प्रति महिना) 150.00 प्रति महिना.

हेटवणे पाणीपुरवठा- अ) प्रक्रिया न केलेले पाणी (रायगड जिल्हा परिषदेबरोबर झालेल्या करारामध्ये नमूद गावांसाठी)- (1.50 प्रति घ.मी.) 2.50 प्रति घ.मी., ब) प्रक्रिया केलेले पाणी (रायगड जिल्हा परिषदेबरोबर झालेल्या करारामध्ये नमूद गावांसाठी)- (2.75 प्रति घ.मी.) 4.00 प्रति घ.मी., क) गावाव्यतिरिक्त घरगुती वापर- (7.00 प्रति घ.मी.) 10.00 प्रति घ.मी.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply