Breaking News

ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्यठार

पनवेल : वार्ताहर

भरधाव वेगाने जाणार्‍या ट्रकची धडक बसून दुचाकीवरील दाम्पत्य ठार झाल्याची घटना बुधवारी (दि. 20) सकाळी मुंबई-गोवा महामार्गावर कर्नाळा हद्दीत घडली. या अपघातानंतर परिसरातील ग्रामस्थांनी ‘रास्ता रोको’ केल्याने काही काळ मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती.

अशोक पोशा वीर (वय 28) व त्यांची पत्नी रेश्मा वीर (वय 25, दोघेही रा. बंगल्याची वाडी, रानसई, ता. उरण) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पती-पत्नीची नावे आहेत. ते दुचाकी (एमएच 46-एवाय 7079)वरून जात असताना महामार्गावर क्षणभर विश्रांती हॉटेलच्या बाजूला एक टँकर (एमएच 43-व्ही 5580) उभा होता. या वेळी या टँकरच्या मागून जात असताना वीर यांच्या दुचाकीला सिलिंडर वाहून नेणार्‍या भरधाव ट्रकने (एमएच 04-सीए 2938) ठोकर मारली. अपघातानंतर ट्रकचालक पळून गेला. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस पथक, तसेच वाहतूक शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जमावास शांत केले. या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, अधिक तपास सुरू आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply