पनवेल : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये शनिवारी (दि. 11) ठएउएछढ ढठएछऊड खछ खझठ उजझध ठखॠकढ अछऊ झङअॠखअठखडच या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करणेत आले होते. महाविद्यालयाचे आयक्यूएसी सेल व सेंट्रल लायब्ररी यांच्या संयुक्त विद्यमाने चर्चासत्र आयोजित करण्यात आले.
चर्चासत्रासाठी सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बर्हाटे, नागपूर विद्यापीठातील लायब्ररी सायन्सच्या प्राध्यापिका डॉ. मंगला हिरवाडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. बीजभाषण प्राध्यापिका डॉ. मंगला हिरवाडे यांनी केले. चर्चासत्रामध्ये मुंबईच्या एसएनडीटी विद्यापीठाचे डेप्युटी लायब्ररियन डॉ. विलास जाधव, पुणे येथील मॉडर्न कॉलेजच्या लायब्ररीयन डॉ. शांताश्री सेनगुप्ता यांची व्याख्याने झाली. सुरुवातीस प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर यांनी पाहुण्यांचा परिचय व स्वागत केले. उपप्राचार्य डॉ. ए. डी आढाव, विविध महाविद्यालयातून आलेले संशोधक प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चर्चासत्र आयोजनासाठी आयक्यूएसी सेलचे समन्वयक प्रा. सोपान गोवे व ग्रंथपाल प्रा. सुनील अवचिते यांनी परिश्रम घेतले. ग्रंथपाल प्रा. सुनील अवचिते यांनी आभार मानले, तर सूत्रसंचालन डॉ. प्रफुल्ल वशेणीकर, डॉ. लीना मेश्राम व प्रा. सायली कवले यांनी केले.
विविध विषयांवर चर्चा
चर्चासत्रामध्ये देशातील संशोधनाचा दर्जा उंचाविण्यासाठी चौर्य वाङ्मयावर प्रतिबंध आणण्यासाठी सध्या काय व्यवस्था आहे? व त्यासाठी कोणती सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत? प्रत्येक महाविद्यालयाच्या लायब्ररीमध्ये आधुनिक तंत्रज्ञाचा वापर करून ग्रंथालय अद्यावत करणे आवश्यक आहे, अशा विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.