पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) मराठी पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालयाचे 29वे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण सोहळा महाराष्ट्राची लोकपरंपरा या शीर्षकाखाली मोठ्या बुधवारी (दि. 8) उत्साहात झाला.
या स्नेहसंमेलन सोहळ्याचे अध्यक्षस्थान जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यकरिणी सदस्य अनिल भगत यांनी भूषवले. स्नेहसंमेलनाला पोलीस सब इन्स्पेक्टर प्रल्हाद माताळे, शकुंतला रामशेठ ठाकूर, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या सभासद अर्चना ठाकूर, पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, माजी नगरसेविका सुशीला घरत, राजश्री वावेकर, माजी गट शिक्षक अधिकारी तथा शालेय पोषण आहार अधीक्षक नवनाथ साबळे, रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य अमित जाधव, आगरी शिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक भगत, निवृत्त शिक्षक संघटना अध्यक्ष नरेश पाटील, शाखा अधिकारी आयडीबीआय बँक पनवेलकडून शिल्पा जैस्वाल, पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष अर्चना पाटील, सुकापुर ग्रामपंचायतीच्या सदस्य प्राची जाधव, सामाजिक कार्यकर्ते अंकुश माताळे, उच्च माध्यमिक विभाग प्राचार्य प्रशांत मोरे, मराठी माध्यमिक मुख्याध्यापक
कैलास सत्रे, इंग्रजी माध्यमिक मुख्याध्यापक संतोष चव्हाण, निलिमा शिंदे, उच्च
माध्यमिक पर्यवेक्षक अजित सोनवणे, कैलास म्हात्रे, पर्यवेक्षिका वैशाली पारधी, संगीत शिक्षक संतोष खरे व अर्चना पाटील, सहाय्यक शिक्षक युवराज धनवटे, सहाय्यक शिक्षक पंढरीनाथ जाधव आदी उपस्थित होते.
मुख्याध्यापक सुभाष मानकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले व प्रास्ताविकेतून मराठी पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाची प्रगतीच्या दिशेने होत असलेली वाटचाल; त्यासाठी संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व संचालक मंडळ यांचे मिळत असलेले सहकार्य याची आवर्जून माहिती सांगितली.
पारितोषिक वितरण सोहळ्यात विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा, पालकांचा व शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. मुख्याध्यापक मानकर यांना चिल्ड्रेन अकॅडमी व गौतम एज्युकेशन सोसायटी इचलकरंजी यांच्यातर्फे बेस्ट स्कूल अवॉर्ड व क्टिव्ह मुख्याध्यापक अवॉर्ड प्रमुख अतिथी पोलीस सब इन्स्पेक्टर प्रल्हाद माताळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला तसेच रोटरी क्लब ऑफ पनवेल महानगर यांच्या वतीने दिला जाणारा वोकेशनल एक्सलन्स अवॉर्ड 2024-25 मुख्याध्यापक सुभाष मानकर यांना मिळाल्याबद्दल समारंभाचे अध्यक्ष अनिल भगत यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. सहाय्यक शिक्षिका विजयश्री थळी व मंजिरी धोत्रे यांना वरील संस्थांतर्फे अॅक्टिव्ह टीचर अवॉर्ड मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
Check Also
पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव
खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …