पनवेल : रामप्रहर वृत्त
तळोजा इंडस्ट्रियल असोसिएशन (टीआयए)च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या इंडस्ट्रियल एक्सपो 2025ला पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 9) भेट दिली.
या वेळी टीआयए अध्यक्ष सतीश शेट्टी, भारतीय कामगार मोर्चाचे उपाध्यक्ष अनिल खोपटे, सचिव संजय भगत यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
तळोजा इंडस्ट्रियल एरियामध्ये बनणारी विविध उत्पादने पाहून आपल्या परिसरातील औद्योगिक वसाहती जागतिक दर्जाची उत्पादने बनवत आहेत याचा अभिमान वाटला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मेकिंग इंडिया हे प्रत्यक्षरीत्या साकार होत आहे आणि त्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साथ लाभत आहे, असे या वेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले.
Check Also
पनवेल महापालिकेचा वर्धापन दिन उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेचा दहावा वर्धापन दिन गुरुवारी (दि. १) उत्साहात साजरा झाला. यानिमित्ताने …
RamPrahar – The Panvel Daily Paper