पनवेल ः प्रतिनिधी
वारदोली ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत भाजपच्या सरपंचपदाच्या
उमेदवाराविरोधात मतदान करणारे उपसरपंच किसन धोंडू पाटील यांची भाजपतून हाकालपट्टी करण्यात आली आहे.
सरपंचपदाच्या निवडणुकीनंतर उपसरपंच किसन धोंडू पाटील यांनी केलेली गद्दारी लक्षात येताच बेलवली भाजप गाव कमिटीने किसन पाटील यांची या गद्दारीबद्दल पक्षातून हाकालपट्टी करावी, अशी मागणी केली होती. पनवेल तालुका भाजपने गाव कमिटीच्या मागणीनुसार पाटील यांची तातडीने हाकालपट्टी केली आहे.
सरपंचपदाच्या निवडणुकीत शह-काटशहाचे राजकारण सुरू असताना भारतीय जनता पक्षाने दिलेला आदेश किसन पाटील यांनी पाळला नाही. त्यामुळेच त्यांच्या या पक्षविरोधी वर्तणुकीमुळे त्यांच्यावर हाकालपट्टीची कारवाई करण्यात आली.