Breaking News

पद्मदुर्गावर लोकवर्गणीतून दोन तोफगाडे ; सह्याद्री प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम

मुरूड ः प्रतिनिधी

मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष देणार्‍या पद्मदुर्ग उर्फ कासा किल्ल्यात जवळपास 41 तोफा असून, त्यातील काही तोफांची मोठ्या प्रमाणात झीज झाली आहे. त्यापैकी दोन मोठ्या तोफा सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे रविवारी (दि. 26) तीनचाकी आणि चारचाकी लाकडी गाड्यांवर बसविण्यात आल्या आहेत.

पद्मदुर्ग उर्फ कासा किल्ल्यातील तोफांचे संवर्धन करण्याच्या हेतूने सह्याद्री प्रतिष्ठानने चाळीसगाव येथील अजय जोशी यांच्याकडून तीनचाकी आणि चारचाकी तोफगाडे तयार करून घेतले आहेत. त्यांचा दुर्गार्पण सोहळा रविवारी आयोजित करण्यात आला होता. सकाळी कोटेश्वरी देवीचे पूजन केल्यानंतर तोफगाड्यांचे दुर्गार्पण करण्यात आले. या वेळी मान्यवरांच्या हस्ते या दोन गाड्यांवर तोफा बसविण्यात आल्या.

मुरूडच्या नगराध्यक्षा स्नेहा पाटील, नगरसेविका वंदना खोत, सह्याद्री प्रतिष्ठानचे अलिबाग विभाग अध्यक्ष संजय पाडेकर, दुर्ग संवर्धन अध्यक्ष गणेश रघुवीर, स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत जोत्याजीची भूमिका करणारे गणेश लोनरे, प्रकाश सरपाटील, शिवसेनेचे मुरूड शाखाप्रमुख आशील ठाकूर, मंगेश चव्हाण, शुभांगी करडे, ललित मढवी, साखरकर मामा यांसह कोळी बांधव या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिष्ठान संस्थापक श्रमिक गोजमगुंडे यांनी सर्वांचे आभार मानले.

– प्रतिष्ठानचे गडसंवर्धन

सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे यापूर्वी जंजिरा किल्ल्यावर कायमस्वरूपी तिरंगा ध्वज लावण्यात आला आहे. तसेच कुलाबा किल्ल्यातील तीन आणि कोर्लई किल्ल्यातील सहा तोफा लाकडी गाड्यांवर बसविण्यात आल्या आहेत.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply