ठाणे : प्रतिनिधीमोखाडा-त्र्यंबकेश्वर मार्गावरील तोरंगणा घाटात बस दरीत कोसळल्याने चार प्रवासी ठार झाले असून, 45 जण जखमी झाले आहेत. शिर्डी दर्शन करून डहाणूकडे जाताना रविवारी (दि. 24) दुपारी हा अपघात झाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुजरातमधील भाविक खाजगी बसमधून शिर्डीहून डहाणूतील महालक्ष्मीच्या दर्शनासाठी येत होते. त्यांची बस दुपारी 2.45च्या तोरंगणा घाटात आली असता, ब्रेक फेल होऊन 25 फूट दरीत कोसळली. अपघाताचे वृत्त समजताच पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी येऊन बचावकार्य व मदतकार्य सुरू केले. बसमधील 56 प्रवाशांपैकी चौघांचा मृत्यू झाला असून, 45 जण जखमी झाले आहेत.
Check Also
वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …
RamPrahar – The Panvel Daily Paper