Breaking News

आदई सर्कल ते चिपळे मार्गावर गतिरोधक बसवा

पनवेल : रामप्रहर वृत्त

आदई ते चिपळे या रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी रायगड जि. प. सदस्य अमित जाधव व पनवेल पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे. आदई ते चिपळे हा रस्ता नव्याने बांधण्यात आला आहे. सदर रस्ता रहदारीचा असल्याने तेथे सतत वाहनांची ये-जा सुरू असते. वाहनचालक बेदरकारपणे वेगात वाहने चालवत असल्याने येथे अपघात होत असून, यामध्ये जीवितहानीही झालेली आहे. त्यामुळे या रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी जोर धरत आहे. येत्या 10 दिवसांत गतिरोधक बसविले नाहीत, तर रास्ता रोको करण्याचा इसारा  रायगड जि. प. सदस्य अमित जाधव व पनवेल पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील यांनी पनवेल सा. बां. विभागाच्या उपअभियंत्यांना दिलेल्या पत्रकात दिला आहे.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply