Breaking News

राज्यात वादळी वारे घोंगावणार, मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये

मुंबई : प्रतिनिधी

श्रीलंका आणि तमीळनाडू किनार्‍यालगतच्या समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असल्याने पश्चिम किनारपट्टीवर पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. त्यानुसार आज देशाच्या दक्षिण आणि पश्चिम किनारपट्टीवर पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. या काही प्रदेशात पाणी साठल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, आज अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र किनारपट्टीपासून दूर जाणार असून पुढील 12 तासांत हे वादळ अजून तीव्र होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे काही ठिकाणी जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, हे वादळ आजपासून पुढील तीन ते चार दिवस ताशी 60 ते 70 च्या वेगाने पुढे सरकणार आहे. त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. प्रादेशिक हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात गेले काही दिवस हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही प्रदेशांचा समावेश असून काही ठिकाणी गेले चार दिवस मेघगर्जनेसह पाऊस सुरू आहे. राज्यातील अनेक भागात ऐन दिवाळीत ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकर्‍यांची भातकापणीसाठी धांदल उडाली आहे. या अंदाजानुसार राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात पावसाच्या हलक्या सरी होणार आहेत. काल पावसाने रत्नागिरी, चिपळूणसह कोकण भागात पाऊस सुरू आहे.

Check Also

रणधीर कपूर धसमुसळ्या नायक, हुशार दिग्दर्शक

रणधीर कपूरला एक पिढी पृथ्वीराज कपूरचा नातू, राज कपूरचा मोठा मुलगा, शम्मी कपूर व शशी …

Leave a Reply