Breaking News

शाळेस सॅनिटरी पॅड वेंडींग मशीन भेट

कर्जत : येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश सोनी आणि परिवार तसेच माहेश्वरी महिला मंडळ यांच्याकडून कर्जत महिला मंडळाच्या विद्याविकास शाळेस सॅनिटरी पॅड वेंडींग मशीन भेट देण्यात आली. या वेळी मंडळाच्या पद्मा सोनी, जसोदा सोनी, सुमित्रा डागा, विमल डागा, सुरेखा राठी, पुष्पा भुतडा, पूनम डागा, मुख्याध्यापिका मिना प्रभावकळर उपस्थित होत्या.

नागोठण्यात आज ‘लाईट ऑफ’

नागोठणे : मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात अडथळा ठरणार्‍या इंद्रप्रस्थ हॉटेल परिसरातील वीजवाहिन्या तसेच खांब सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या कामासाठी नागोठणे शहराचा वीजपुरवठा शुक्रवारी (दि. 21) दिवसभर बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती येथील वीजवितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता वैभव गायकवाड यांनी दिली. सकाळी 10 ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित ठेवण्यात येणार असून, नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

चौकमध्ये रविवारी गुणवंतांचा सत्कार

चौक : नेताजी पालकर जन्मस्थळ व पुरातन मुंजोबा देवस्थाच्या नवव्या जीर्णोद्धार दिनानिमित्ताने सरनौबत नेताजी पालकर मंडळातर्फे  रविवारी (दि. 23) दुपारी 2 वाजता गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. चौकमधील नुतन हनुमान मंदिरामध्ये ह.भ.प. हरी महाराज माळी यांच्या अध्यक्षतेखाली व प्राचार्या ज्योती देवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार्‍या या समारंभात येथील सरनौबत नेताजी पालकर विद्यामंदिर व यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालयातील दहावी व बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या वेळी उत्पादन शुल्क विभागाचे निवृत्त सहाय्यक आयुक्त सुहास पाटील यांचे ‘राज्य व केंद्रिय स्टाफ सिलेक्शन व रोजगाराच्या संधी‘ या विषयावर व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमाला विद्यार्थी व युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मंडळाचे संघटक यशवंत सकपाळ (9326153737) यांनी केले आहे.

रोह्यात रविवारी रक्तदान शिबिर

रोहा : अभंग सेवा मंडळ व स्फूर्ती प्रतिष्ठान यांच्या संयुक्तवतीने रविवारी (दि. 23) सकाळी 9 ते दुपारी 2.30 या वेळेत रोह्यातील भाटे सार्वजनिक वाचनालय सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply