Breaking News

शिवरायांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; कर्जतमधील तरुणास अटक

कर्जत : प्रतिनिधी
कर्जत तालुक्यातील दामत येथील एका मुस्लीम तरुणाने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात अपमानकारक तसेच मुघल बादशहा औरंगजेबाचे उद्दातीकरण करणारा व्हिडीओ सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी त्या तरुणाला नेरळ पोलिसांनी अटक केली असून त्यास न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दामत येथील तरुण हमजा खोत याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविरोधात अवमानजनक तसेच महाराष्ट्रद्वेष्टा औरंगजेबाचे उद्दातीकरण करणारा व्हिडीओे पोस्ट केला. शिवयायांबदल अपमानास्पद पोस्टमुळे शिवप्रेमींची भावना दुखावली गेली असल्याने व कायदा व सुव्यवस्था राखण्याप्रती नेरळमधील श्याम कडव या शिवप्रेमीने नेरळ पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. त्यानुसार हमजा खोत या तरुणाविरुद्ध भा.दं.वि. कलम 295 अ गुन्हा नोंद दाखल झाला आहे.
दरम्यान, नेरळमधील तमाम शिवप्रेमींनी त्या विकृत तरुणावर कडक कारवाईसंदर्भात पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांना निवेदन दिले आहे.

Check Also

आमदार महेश बालदी यांचा विविध वाड्यांमध्ये प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा प्रचार सभा प्रमुख प्रवीण काळबागे, माजी जि.प.सदस्य ज्ञानेश्वर घरत …

Leave a Reply