पेण : प्रतिनिधी
तालुक्यात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली असून, अवघ्या तीन दिवसांत तब्बल 52 जणांना श्वानदंश झाला आहे. त्यात जखमी झालेल्यांवर विविध रूग्णालयांत उपचार करण्यात आले.
भटक्या कुत्र्यांमुळे पेण तालुक्यातील नागरिक त्रस्त झाले आहेत. मागील तीन दिवसांत पेण शहरातील 37 जणांना तर तालुक्यातील अन्य गावातील 15 जणांना कुत्र्यांनी जखमी केले आहे. शहरातील रामवाडी, लोकमान्य सासोयटी, देवनगरी या परिसरात राहणार्यांना अधिक संख्येने श्वानदंश झाला आहे. त्यांच्यावर पेण उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले; तर दोन रूग्णांना अलिबाग येथील जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.
श्वानदंश झालेल्या रूग्णांमध्ये मनोज मोरे, नरेश पवार, कमलेश तिवारी, यशवंत गावडे, राकेश म्हात्रे, किरण म्हात्रे, जोमा पाटील, नंदकुमार म्हात्रे, अविनाश पाटील, वंदना बामणे, मगदू महादू, भाई पाटील, नेहा मुंडे, अनंत पाटील, नीरज भोईर, सुगंधा कोळी, जुही राजेशिर्के, प्रतीक्षा म्हात्रे, सुनील पवार, आशुतोष भोसले, महेश भोसले, सुधीर शिवकर, उमेश प्रजापती, पारस कावतकर, दीपक म्हात्रे, सुनील चौधरी, संदीप विश्वकर्मा, एस. के. शेख, सिबु मेहतू, लक्ष्मण पाटील, सुहास मराठे, अर्चना पाटील, रवींद्र धनावडे, देवनगरी, राजेश पाटील, चेतन पाटील, रूपेश सावंत, ओमकार माने, प्रतीक पाटील आदींचा समावेश आहे. तर तालुक्यातील लता म्हात्रे-दिव, नीलेश वाघमारे- निगडेवाडी, प्रकाश वाघमारे- दर्गावाडी, नारायण म्हात्रे- वढाव, हार्दिक दिवेकर-कोळवे, चंद्रकांत पाटील – कळवे, मयूर पाटील-रोडे, हरिभाऊ कांबळे-उंबर्डे, मनीश पाटील-मुंगोशी, कुशल म्हात्रे- लाखोले, वंदना गोडिवले-वडगाव, प्रशांत घरत-दादर, रमेश पाटील- सरेभाग, लक्ष्मी भगत- हमरापूर, चंद्रकांत म्हात्रे- बोरी यांना श्वानदंश झाला आहे.