Breaking News

डॉक्टर्स डेनिमित्त रोह्यात आरोग्य शिबिर

रोहा : प्रतिनिधी

 डॉक्टर्स डे निमित्त रायगड आणि रोहा तालुका मेडीकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि. 1) रोह्यातील शासकीय कर्मचार्‍यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. त्याचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी रविंद्र बोंबले यांनी केले. कायम तणावपुर्ण आयुष्य जगणार्‍या सरकारी कर्मचार्‍यांसाठी हे शिबिर नवसंजीवनी देणारे ठरेल, अशी भावना रायगड मेडीकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. देवेंद्र जाधव यांनी या वेळी व्यक्त केली. या शिबिरात शंभर हुन आधिक कर्मचार्‍यांची मोफत आरोग्य तपासणी करुन त्यांचे समुपदेशन करण्यात आले. तालुका मेडीकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. फरीद चिमावकर यांच्या पुढाकारातून घेण्यात आलेल्या या शिबिराला तहसीलदार कविता जाधव, डॉ. आनंद वागळे, डॉ. अश्विनी जाधव, डॉ. अंकिता खैरकर, डॉ. जी. एन. जोशी, डॉ. सुप्रिया जोशी, डॉ. तेजकुमार आपणकर, डॉ. विनोद किणीकर, डॉ. रूपेश होडबे, डॉ. अपूर्वा क्षीरसागर यांच्यासह तालुक्यातील डॉक्टर्स उपस्थित होते.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून मराठी अर्थशास्त्र परिषदेला 20 लाखांची देणगी

पनवेल : रामप्रहर वृत्त समाजाच्या हितासाठी अखंडपणे सामाजिक कार्य करणारे आणि कायम सामाजिक बांधिलकी जपणारे …

Leave a Reply