Breaking News

17 वर्षीय मुलीचे अपहरण

पनवेल : कॉलेजला गेलेली तरुणी घरी परत न आल्याने तिचे अपहरण झाल्याची तक्रार (दि. 28 जून) शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. ही 17 वर्षीय तरुणी पनवेल शहरातील एका कॉलेजमध्ये गेली होती. त्यानंतर तिला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले असल्याची तक्रार करण्यात आली आहे. तिने अंगामध्ये गुलाबी रंगाचा शाळेच गणवेश घातलेला आहे.

कारची अ‍ॅक्टीव्हाला धडक

पनवेल : महावितरण कार्यालय भिंगारी येथे एका चारचाकी गाडीने दुचाकीला धडक दिली आहे. यात दोघेजण जखमी झाले असून कार चालकाविरोधात (दि. 28) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आसिफ मोहमुद्दीन अन्सारी (वय 18, रा कुंभारवाडा, भिंगारीगाव) हा त्याचा मित्र रितेश तळेकर याच्यसोबत अ‍ॅक्टीव्हा क्र.(एमएच 46, ए. एन. 2991) घेऊन महावितरण कार्यालयासमोरुन जात होता. या वेळी भरधाव वेगात येणार्‍या कार क्र. (एमएच 46, एडी 2544)वरील चालकाने त्यांच्या अ‍ॅक्टीव्हा गाडीला समोरुन धडक दिली. या अपघातात आसिफ व रितेश हा जखमी झाले असून कारचालक पळून गेला आहे.

डॉलर देतो सांगून फसवणूक

पनवेल : डॉलरचे आमिष दाखवून त्या बदल्यात खारघर येथील एका 33 वर्षीय तरुणाची एक लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. श्रवणकुमार भोमराज मेवाडा हे साईप्रेरणा सोसायटी, सेक्टर 12, खारघर येथे राहत असून त्यांचा कापड विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांच्या दुकानात एक अनोळखी महिला येऊन तिने तिच्याकडे अमेरिकन डॉलर असल्याचे सांगून ते विकायचे असल्याचे सांगितले. मेवाडा हे एक लाख रुपये घेऊन कोपरीगांव, नवी मुंबई येथे त्या महिलेला भेटण्यासाठी गेले. त्यांनी मेवाडा यांच्याकडून एक लाख रुपये घेऊन त्यांनी त्यांच्या हातातील रुमालात बांधलेले डॉलरचे गाठोडे दिले. नंतर पाहिल्यावर त्यात डॉलर नव्हते, असे त्यांच्या लक्षात आले.

पनवेल शहरातून तरुण बेपत्ता

पनवेल ः पनवेल शहर परिसरात राहणारा 19 वर्षीय तरुण राहत्या घरातून कोणास काहीही न सांगता कोठेतरी निघून गेला आहे. तो हरविल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तिरुपती दिलीप लोखंडे असे या तरुणाचे नाव असून रंग सावळा, उंची 5 फूट 5 इंच, चेहरा गोल, केस काळे-रंगविलेले असून अंगात काळ्या रंगाची जीन्स पॅन्ट व आकाशी रंगाचा फूल शर्ट घातलेला आहे. त्याला मराठी व हिंदी भाषा अवगत असून सोबत मोबाईलही फोन आहे.

विवाहिता मुलीसह बेपत्ता

पनवेल ः शहरातील सुफा मशिदच्या मागे राहणारी शगुफता शहजाद फक्की (22) ही तिची दीड वर्षाची मुलगी आईशा हिला घेेऊन बाजूच्या घरामध्ये जाते, असे सांगून घराबाहेर पडली ती अद्याप घरी परतली नाही आहे. शगुफता हिचा चेहरा गोल, उंची चार फूट पाच इंच, डोक्याचे केस काळे लांब असून तिला मराठी व हिंदी भाषा अवगत आहे. तसेच तिच्या अंगात लाल रंगाचा पंजाबी ड्रेस घातलेला आहे. अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे (27452333) यावर संपर्क साधावा.

कार्यालयातून दोन लॅपटॉपची चोरी

पनवेल ः व्ही. के. हायस्कूलजवळ असलेल्या राजहंस बंगल्यात राहणारे प्रणिल बारटक्के यांच्या बंगल्यामध्येच एलआयसी संपर्क कार्यालय आहे. हे कार्यालय बंद असल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी खिडकीचे रॉड तोडून आत प्रवेश केला व जवळपास 40 हजार रुपये किंमतीचे दोन लॅपटॉप चोरुन नेले आहेत. 

मेडीकल स्टोअर्समध्ये चोरी

पनवेल ः कळंबोली वसाहतीतील तन्मय मेडिकल आणि जनरल स्टोअर्स दुकान नं. 7, गोकुळधाम, प्लॉट नं. 7, सेक्टर 4 या दुकानाचे मुख्य शटर उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश करून चोरी केल्याची घटना घडली आहे.

कुरियर कंपनी कार्यालयात चोरी

पनवेल ः खारघर सेक्टर-15 मधील गुडवील पॅराडाईज इमारतीमध्ये ब्ल्यू डार्ट कंपनीचे कार्यालय आहे. पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने या कार्यालयाचे शटर उचकटून कार्यालयातील सुमारे दोन लाख रुपयांची रोख रक्कम असलेली तिजोरी चोरुन नेली. कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेर्‍याची तपासणी केली असता, त्या कार्यालयात तोंडाला रुमाल बांधून घुसलेल्या चोरट्याने ही चोरी केल्याचे निदर्शनास आले.

योगसखा मासिकाचा 15वा वर्धापन

पनवेल : गेली 30 वर्षे पनवेल परिसरातील नागरिकांना योगाभ्यासाचे धडे देऊन ‘फिट अ‍ॅण्ड फाइन’ ठेवणार्‍या इन्स्टिट्यूट ऑफ योग व आयुर्वेद आणि आरोग्य सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने चालविण्यात येणार्‍या योग केन्द्रातर्फे प्रकाशित होत असलेले ‘योगसखा’ हे मासिक आपल्या यशस्वी वाटचालीची 15 वर्षे पूर्ण करीत असून ‘योगसखा’ मासिकाचा ‘विद्यार्थी जगत आणि योग’ विशेषांक रविवारी (दि. 7) सकाळी 10 वाजता आरोग्य मंदीर, गोदरेज प्लाझा, पनवेल येथे प्रकाशित होत आहे. याप्रसंगी आदर्श टीचर्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या प्राचार्या जाई जगताप या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.

मानघर येथे गुरुपोर्णिमा 

उरण ः पनवेल तालुक्यातील मानघर-मोसारे येथील श्री  स्वामी समर्थ महाराज मठात गुरुपोर्णिमानिमित्त मंगळवारी (दि. 16) विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व स्वामी भक्तांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, अशी विनंती स्वामी भक्त संजय आत्माराम पाटील यांनी केली आहे. सकाळी 6 ते 7 स्वामी चरण, मूर्ती अभिषेक, समस्त देवता पूजन, 10. 30 ते 12 वाजता भजन, दुपारी 12 वाजता महाआरती, दुपारी 1 वाजता  महाप्रसाद (भंडारा) आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply