Breaking News

अवजड वाहनांची अनधिकृत पार्किंग ताबडतोब हटवा

आमदार महेश बालदी यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त
राष्ट्रीय महामार्ग कार्यालय ते जेएनपीटी पोर्ट तसेच द्रोणागिरी नोड-भेंडखळ बीपीसीएल प्रोजेक्ट सर्व्हिस रोड व मुख्य रस्ता येथे होत असलेल्या अवजड वाहनांची अनधिकृत पार्किंग ताबडतोब हटविण्यात यावी, अशी मागणी उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आमदार महेश बालदी यांनी निवेदनात म्हटले आहे की, कळंबोली ते उरणकडे जाणार्‍या रस्त्यावर डी पॉईंट राष्ट्रीय महामार्ग कार्यालय ते जेएनपीटी पोर्ट तसेच द्रोणागिरी नोडमधील सर्व्हिस रोड, भेंडखळ बीपीसीएल सर्व्हिस रस्त्यावर दुतर्फा अवजड वाहने अनधिकृत पार्किंग केली जातात. यामध्ये गॅस सिलिंडर, पेट्रोल, डिझेल यासारख्या ज्वलनशिल पदार्थाचा समावेश असतो. भेंडखळ गावानजीक बीपीसीएल कंपनी आहे. या कंपनीमधून गॅस सिलिंडरची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. कंपनीत वाहने पार्क करता येत नसल्यामुळे वाहने रस्त्याच्या दोन्ही बाजूस पार्क केली जात आहेत. परिणामी या वाहनांचे ड्रायव्हर, क्लिनर या गाडीखाली स्टोव्ह पेटवून आपले जेवण शिजवतात. ज्वलनशील पदार्थांच्या गाडीखाली स्टोव्ह पेटवल्याने स्फोट होण्याची दाट शक्यता आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात आसपासच्या गावांना नुकसान होण्याची भीती आहे.
अनेकदा या परिसरात अपघात होऊन अनेक दुचाकीस्वार जखमी व मृत्यूमुखी पडलेले आहेत. त्यामुळे याकडे लक्ष देणे गरजेचे आणि त्यासाठी हे बेकायदेशीर अनधिकृत पार्किंग बंद करून रस्ते मोकळे करावेत, असेही या निवेदनात अधोरेखित करण्यात आले आहे.

Check Also

पनवेलमध्ये महायुतीकडून जोमाने प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलला विकासाच्या दिशेने नेणारे कर्तृत्वत्वान आमदार प्रशांत ठाकूर चौथ्यांदा या विधानसभा …

Leave a Reply