Breaking News

माची प्रबळ, गाढेश्वर, मोरबे धरणावर बंदोबस्त

तीन पोलीस अधिकार्‍यासह 35 कर्मचार्‍यांची नियुक्ती

पनवेल ः बातमीदार – गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नद्या, नाले, धरणे ओसंडून वाहू लागले आहेत. याचा लाभ पर्यटक घेत आहेत. परिसरातील नद्या, धरणे याकडे पर्यटक आकर्षित होत आहेत. मात्र याच दरम्यान पाण्यात जाताना सावधानता बाळगण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. मंगळवारी पनवेल तालुक्यातील वाजे गावातील कुंडी धबधब्यात बुडून एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सावधानता बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तालुका पोलिसांकडून कर्नाळा, माची प्रबळ, गाढेश्वर, मोरबे धरणावर 35 पोलीस कर्मचारी व 3 पोलीस अधिकार्‍यांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

पनवेल तालुक्यातील गाढेश्वर धरण व मोरबे धरणाकडे जाणार्‍या पर्यटकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. शनिवार आणि रविवार सुटीचा वार म्हटला की हजारोंच्या संख्येने पर्यटक या धरणांत मौजमजा करण्यासाठी येतात. या ठिकाणी मद्यप्राशन करून पाण्यात पोहोण्यासाठी जातात. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी गाढेश्वर धरणावर शनिवार व रविवारी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे, तसेच मोरबे धरण, तसेच माची प्रबळ गडावर 35 पोलीस कर्मचारी व 3 पोलीस अधिकार्‍यांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांनी दिली आहे. पाऊस सुरू झाला रे झाला की पर्यटकांची गर्दी या धरणावर होते. पनवेल महानगरपालिकेच्या मालकीचे असलेले हे देहरंग धरण अनेक वेळा पर्यटकांचा कर्दनकाळ ठरलेले आहे. देहरंग धरण पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांनी मात्र पर्यटकांना या ठिकाणी मद्य घेऊन जाण्यावर, तसेच मद्य प्राशन करून जाण्यावर अटकाव आणल्यामुळे गाढेश्वर धरणावर येणार्‍या पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. वाजेफाटा, गाढेश्वर मंदिर, धोदाणी गाव, कुंडी धबधबा, मोरबे धरण, माची प्रबळ, कर्नाळा आदी ठिकाणी पोलिसांमार्फत सूचना फलक लावण्यात आले आहेत. काही अंतरावर तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. पोलिसांची पेट्रोलिंगदेखील चालू राहणार आहे. पोलीस बंदोबस्त ठेवल्यामुळे या ठिकाणी बुडून मरण पावण्याच्या घटनेला आळा बसण्यास मदत झाली आहे.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply