Breaking News

कुंडेवहाळ पूरग्रस्तांना प्रशांत ठाकूर यांचा दिलासा

महेश बालदी व ग्रामपंचायतीकडूनही सहकार्य

पनवेल ः रामप्रहर वृत्त

तालुक्यातील कुंडेवहाळ ग्रामपंचायतीच्या हद्दीतील बंबावी कोळीवाडा येथे मुसळधार पावसामुळे शनिवार (दि. 29)पासून पाच दिवस पाणी शिरले होते. सरपंच सदाशिव रामदास वास्कर व ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन या पाण्याचा निचरा होण्यासाठी प्रयत्न केले. सरपंच सदाशिव वास्कर यांनी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्याशी संपर्क साधला. प्रशांत ठाकूर यांनी तातडीने सिडकोच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला व उपाययोजना करण्याची सूचना केली. त्यानुसार सिडकोने आठ फोकलेन लावून पाण्याचा निचरा केला. जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांनी स्वखर्चातून प्रत्येक कुटुंबाला तातीडची तीन हजार रुपयांची आर्थिक मदत केली तर ग्रामपंचायतीच्या माध्यमातूनही जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. बंबाई कोळीवाडा येथे पाणी साचल्याने ग्रामस्थांंचे मोठे नुकसान झाले. एअरपोर्टच्या कामासाठी नाला बंद केल्याने ही स्थिती निर्माण झाली. अखेर हा नाला मोकळा करण्यात आला. बंबावी कोळीवाड्यातील सर्व ग्रामस्थ तसेच कुंडेवहाळ गावातील नामदेव कृष्णा भोईर, माजी सरपंच आर. आर. वास्कर, सरपंच सदाशिव वास्कर, उपसरपंच दत्ता पाटील, किसन वाग्राम वास्कर, हासुराम वास्कर, प्रविण पाटील, सुभाष पाटील, तुकाराम वास्कर, अरविंद वास्कर, रजनिकांत पाटील, संदीप धाऊ वास्कर, संदीप किसन वास्कर, समाधान वास्कर, ऋषिकेश दिलीप वास्कर, तुषार पाटील, सुभाष म्हात्रे व कुंडेवहाल गावातील अनेकजण य परिस्थितीत धावून गेले व पाच दिवस साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी मदत केली. बंबावी कोळीवाड्यातील सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन एकमेकांना सहकार्य केले, पाणी काढण्यासाठी मदत केली. आमदार मनोहरशेठ भोईर यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply