उरण ः प्रतिनिधी
मागील सरपंचपदाच्या कारकिर्दीत केलेल्या विकासकामांच्या पाठबळावर सोनारी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीचा विजय निश्चित असून, आम्ही महाआघाडीला धूळ चारणार, असा दावा माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य महेश कडू यांनी केला.
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी यांनीही सोनारी गावाच्या विकासात भरघोस अशी भर घातली असून, ग्रामपंचायत निवडणुकीत थेट सरपंचपदासाठी उभ्या असलेल्या युतीच्या उमेदवार पूनम कडू यांच्यासह तीनही प्रभागातील सदस्यपदाचे युतीचे सर्व उमेदवार मोठ्या फरकाने निवडून येतील, असा ठाम विश्वास महेश कडू यांनी व्यक्त केला आहे.