अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात सोमवारी (दि. 14) सकाळी पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी रिमझिम, तर काही भागात जोरदार पाऊस झाला आहे.
रायगडमध्ये रिमझिम रायगड जिल्ह्यात सोमवारी (दि. 14) सकाळी पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी रिमझिम, तर काही भागात जोरदार पाऊस झाला आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हा पाऊस पडत आहे. मागील चार ते पाच दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर अधूनमधून शिडकावा होत आहे.
सोमवारी सकाळी पडलेल्या पावसामुळे रस्ते निसरडे झाले असून, किरकोळ स्वरूपाचे अपघात होत असल्याचे दिसून आले.
या अवकाळी पावसाचा फटका आंबा पिकाबरोबरच वाल, पावटा, भुईमूग, तूर यासारख्या कडधान्य पिकांनाही बसतो आहे.
Check Also
शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …