Breaking News

भाजप युतीच्या उमेदवारांना विजयी करा -पूनम कडू

जेएनपीटी ः प्रतिनिधी

सोनारी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप युतीच्या उमेदवारांना ग्रामपंचायत निवडणुकीत भरघोस मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन सरपंचपदाच्या उमेदवार पूनम महेश कडू यांनी मतदारांना केले. त्या प्रचारसभेत बोलत होत्या. व्यासपीठावर भाजपचे तालुकाध्यक्ष रविशेठ भोईर, उरणच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे, जिल्हा चिटणीस चंद्रकांत घरत, ज्येष्ठ नेते कृष्णा कडू, कामगार नेते सुधीर कडू, दीपक भोईर, नगरसेवक राजेश ठाकूर, माजी सरपंच प्रतीक्षा तांडेल, तालुका चिटणीस सुनील पाटील, दिनेश तांडेल, देवेंद्र पाटील, प्रकाश ठाकूर, प्रकाश कडू, हरिश्चंद्र कडू यांच्यासह भाजप युतीचे उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदार उपस्थित होते. या वेळी भालचंद्र कडू यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जेएनपीटी विश्वस्त तथा भाजप जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली उरण तालुक्याचा विकास झपाट्याने होत आहे. या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली सोनारी गावातील रहिवाशांना भेडसावणार्‍या समस्यांचे निवारण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही पूनम कडू यांनी दिली. कै. सुरेशदादा कडू यांच्या नावाचा वापर करून आमच्यासारख्या सामान्य माणसावर भ्रष्टाचाराचे आरोप करणार्‍यांनी काय दिवे लावले हे सोनारीतील  ग्रामस्थांना ठाऊक आहे. त्यामुळे अशा विरोधकांना त्यांची जागा होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जनता दाखवून देईल, असे सदस्यपदाचे उमेदवार मेघश्याम कडू यांनी स्पष्ट केले. केंद्रात व राज्यात भाजप युतीची सत्ता आहे. यापुढेही ती आबाधित राहणार आहे. त्यामुळे सोनारी गावच्या विकासासाठी भाजप युतीच्या उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन माजी सरपंच व भाजप युवा नेते महेश कडू यांनी करून विरोधकांच्या भ्रष्ट कारभाराचा पंचनामा केला, तर ज्येष्ठ नेते कृष्णा कडू यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी यांचे हात बळकट करण्यासाठी भाजप युतीच्या उमेदवारांना विजयी करा, असे नमूद केले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply