Breaking News

पनवेल परिसरात ट्रॅक्टरची स्वस्तात विक्री

खरेदीसाठी लहानांसह मोठेही होतायेत आकर्षित

पनवेल : प्रतिनिधी

पंजाबमधील शेतकर्‍यांच्या आंदोलनामुळे पंजाबचे ट्रॅक्टर  स्वस्त झाले असून पनवेल-वडखळ महामार्गावर शेकडो ट्रॅक्टर विक्रीला असल्याचे दिसून येत आहे. रायगडमधील छोट्या शेतकर्‍यांची 250 रुपयात मिळणार्‍या ट्रॅक्टर खरेदीसाठी गर्दी होताना दिसत आहे. लवकरच उडणारी छोटी विमाने ही येथे विक्रीला येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर पनवेलपासून वडखळपर्यंत रस्त्यावर अनेक ठिकाणी फायबरचे छोटे ट्रॅक्टर घेऊन बसलेले अनेक जण दिसतात. अचानक दोन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात हे विक्रेते दिसू लागल्याने त्यांच्या जवळ चौकशी केली असता. पंजाबच्या आझाद इंडस्ट्रीचेमध्ये बनवलेले हे खेळण्यातील ट्रॅक्टर आहेत. फायबरपासून बनवलेले असल्याने वजनाला हलके आणि सहज न तुटणारे आहेत. खर्‍या ट्रॅक्टरसारखे दिसत असल्याने लहान मुलांना ते आवडतात. उजैनच्या जितेंद्र बंजारा यांनी सांगितले की, गावाकडे नोकरी नसल्याने आम्ही इकडे धंदा करायला आलो. सुरूवातीला रोज 25 ते 30 ट्रॅक्टर विकायचो आता आमची संख्या वाढल्याने 10 ते 15 ट्रॅक्टर विकतो.पनवेलपासून-वडखळ पर्यंत आमची 50 पेक्षा जास्त माणसे आलेली असून आम्ही सगळे पेणला राहतो. सकाळी 11 पासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत धंदा करतो. महाराष्ट्रात नाशिक, पुणे, नगरपासून सोलापूर पर्यंत आमची माणसे आहेत. लवकरच रिमोटवर चालणारे उडणारे विमान ही विक्रीसाठी आणण्यात येणार आहे.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply