Breaking News

अश्विनच्या नव्या शैलीने सारे चकीत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

भारतीय फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन याने तामिळनाडू प्रीमियर लीग (टीएनपीएल)च्या एका सामन्यात फेकलेल्या हटके चेंडूने सर्वांनाच आश्चर्यचकित केले. अश्विनची ही गोलंदाजी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. टीएनपीएलमध्ये डिंडीगुल ड्रँगस संघाकडून खेळताना अश्विनने मुदरै पँथर्सविरोधात उत्कष्ट गोलंदाजी करीत चार षटकांमध्ये 16 धावा देत तीन बळी घेतले. अश्विन कर्णधार असलेल्या डिंडीगुल संघाने 30 धावांनी हा सामना जिंकला.

डिंडीगुलने सहा गडी गमावत 182 धावा केल्या होत्या. यामध्ये के. नारायण जगदीशन याने 51 चेंडूंत 12 चौकार आणि एक षटकार ठोकत नाबाद 87 धावा केल्या. यानंतर मदुरै पँथर्स संघ 20 षटकांमध्ये 9 गडी गमावत 152 धावाच करू शकला. जगदीशन सामनावीर ठरला.

याच सामन्यात अश्विनने वेगळ्या प्रकारे गोलंदाजी केले. चेंडू फेकताना त्याने शेवटपर्यंत चेंडू मागे लपवला आणि डाव्या हाताने कोणत्याही प्रकारची हालचाल केली नाही. हवेत एखादा फुगा सोडावा असा हा चेंटू वाटला. समोरच्या फलंदाजालाही हा चेंडू उशिरा कळला आणि त्याने उंच फटकाही लगावला, मात्र तो झेलबाद झाला.

अश्विन डावातील अंतिम षटक फेकत होता. समोरील संघाला विजयासाठी 32 धावांची आवश्यकता होती. अश्विनने या षटकात फक्त दोन धावा दिल्या आणि दोन बळीही घेतले. अश्विनच्या डिंडीगुल संघाचा हा सलग दुसरा विजय आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply