Breaking News

नवीन पनवेलमधील भुयारी पूल ऑक्टोबरपासून वाहतुकीस खुला

पनवेल : प्रतिनिधी

नवीन पनवेलमधून जुन्या पनवेलकडे (तक्का) जाण्यासाठी सुरू असलेले भुयारी मार्गाचे काम आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे पूर्ण झाले असून हा मार्ग ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस सुरू होईल. या भुयारी मार्गामुळे नवीन पनवेलसह विचुंबे, उसर्ली परिसरातील नागरिकांना वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळणार आहे. नवीन पनवेलमधील सेक्टर 15, 15 ए, 16, पोदी व विचुंबे या भागांतून राष्ट्रीय महामार्गावर जाण्यासाठी पोदीजवळील रेल्वे गेट ओलांडून किंवा  एचडीएफसी सर्कलच्या पुलावरून जावे लागते. या पुलावर नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असते. कारण माथेरान रस्त्याकडून व डी-मार्ट भागातून येणारी वाहतूकही या पुलावरूनच होत असते. या भागाचा विकास झपाट्याने झाल्याने मोठे प्रकल्प उभे राहिले. नागरी वस्ती वाढल्याने वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागते. त्यामुळे आज पोदीजवळ असलेल्या रेल्वे गेटचा वापर नागरिक व विद्यार्थी धोकादायक पद्धतीने करीत आहेत. त्यामुळे पोदीवरील भुयारी मार्गाची मागणी करण्यात आली होती.

या भुयारी मार्गासाठी 10 कोटींपेक्षा जास्त निधी खर्च करण्यात आला आहे. ठेकेदाराच्या टेंडरमधील कालावधीप्रमाणे मे 2018मध्ये काम पूर्ण होणे गरजेचे होते, पण डिसेंबर 2017पासून काम बंद पडले होते. याबाबत नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ आणि तेजस कांडपिळे यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना माहिती दिली असता त्यांनी हे काम सुरू करण्यासाठी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन काम पूर्ण करण्याची मागणी केली. 

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply