माणगाव : प्रतिनिधी
सीएए अर्थात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ माणगाव येथे शनिवारी (दि. 8) भारतीय जनता पक्षातर्फे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली व माणगाव तालुका अध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांच्या नियोजनाखाली भव्य रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह नागरिक शेकडोंच्या संख्येने सहभागी झाले होते.
या वेळी अॅड. महेश मोहिते यांनी आपल्या मनोगतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशहिताच्या दृष्टीने सीएए कायदा देशात लागू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले, तर विविधता मे एकता यही हमारी भारतीयोंकी विशेषता, असे मुंबई संविधान सम्यक मंचचे अध्यक्ष उमेश गायकवाड यांनी म्हटले.
माणगाव तहसील कार्यालय येथून सीएए समर्थन रॅलीला प्रारंभ झाला. या रॅलीत सम्यक मंचचे अध्यक्ष उमेश गायकवाड, भाजपचे श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघा अध्यक्ष कृष्णा कोबनाक, ज्येष्ठ नेते संजय कोनकर, भालचंद्र महाले, माणगाव तालुका अध्यक्ष संजयआप्पा ढवळे, श्रीवर्धन तालुका अध्यक्ष प्रशांत शिंदे, म्हसळा तालुका अध्यक्ष प्रकाश रायकर, रोहा तालुका अध्यक्ष सोपान जांभेकर, तळा तालुका अध्यक्ष कैलास पायगुडे, महाड तालुका अध्यक्ष जयवंत दळवी, पोलादपूर तालुका अध्यक्ष प्रसन्न पालांडे, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष अमित घाग, उपाध्यक्ष चिन्मय मोने, भाजप माणगाव तालुका सरचिटणीस योगेश सुळे, अल्पसंख्याक सेलचे अमीर खानजाडे, महिला मोर्चा तळा तालुका अध्यक्ष हेमा मानकर, प्राजक्ता शुक्ला, राजू मुंढे, बाबुराव चव्हाण, संजय जाधव, वसंत शेडगे, उमेश साटम, माणगाव तालुका महिला मोर्चाच्या कार्यकर्त्या शर्मिला सत्वे, दीपाली जाधव, यशोधरा गोडबोले, स्मिता भोईर, अश्विनी खरे, नीलम काळे, उषा महाडिक, दीप्ती नकाशे, अश्विनी जाधव यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते व बहुजन समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. मुंबई-गोवा महामार्गाने बाजारपेठेतून बालाजी कॉम्प्लेक्सपर्यंत फिरून तिची सांगता झाली.
Check Also
पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper