नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
स्मार्ट कॉन्सेप्टजच्या वतीने आयोजित ‘मान्सून रन’ला रविवारी (दि. 21) नवी मुंबईकरांचा उदंड प्रतिसाद लाभला. ‘मासिक पाळीतील स्वच्छता’ अशी थीम असलेल्या या जनजागृतीपर स्पर्धेत 3093 स्पर्धकांनी सहभाग घेतला.
मुग्धा कथुरिया यांनी स्थापित केलेल्या स्मार्ट कॉन्सेप्टजच्या माध्यमातून गेली चार वर्षे वर्षा मॅरेथॉनचे आयोजन केले जाते. आपल्या समाजात मासिक पाळी व त्याबाबतची स्वच्छता यावर बोलण्यास जास्त कुणी पुढे येत नाही. हीच गोष्ट लक्षात घेऊन एमएचएम अर्थातच मासिक पाळीदरम्यानची स्वच्छता यावर यंदा मॅरेथॉनद्वारे जनजागृती करण्यात आली.
या स्पर्धेत 21 किलोमीटर व 10 किलोमीटर या मुख्य शर्यतींसह पाच किलोमीटरची फन व फॅमिली दौड झाली. स्पर्धेत भाग घेणार्यांना टी-शर्ट, डिजिटल प्रमाणपत्र, पाण्याची बाटली, ज्यूस, नाश्ता व भेटवस्तू देण्यात आल्या.