Breaking News

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने वह्यावाटप

पनवेल ः रामप्रहर वृत्त  – साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने वह्यावाटप कार्यक्रमाचे गुरुवारी (दि. 1) आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम पनवेल महापालिकेच्या नगरसेविका संतोषी तुपे यांच्या जनसंपर्क कार्यालयात झाला, तसेच बेलवली शाळेतही वह्यावाटप करण्यात आले.

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून शैक्षणिक उपक्रम राबवून गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यात येत असते. त्याअंतर्गत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून कामोठे प्रभाग क्रमांक 11मधील विद्यार्थ्यांना श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने वह्यावाटप कार्यक्रमाचे नगरसेविका संतोषी तुपे यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजन करण्यात आले होते. या वेळी भाजपचे प्रभाग क्रमांक 11चे अध्यक्ष रमेश तुपे, ललिता इनकर, सीमा साबळे, श्रीमती गायकवाड, श्रीकांत नलावडे, सचिन खुडे, सुंदर वाघमारे, वैशाली साबळे, संदीप तुपे, सागर तुपे, शक्तिकेंद्र प्रमुख संदीप तुपे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थी उपस्थित होते, तसेच मंडळाच्या वतीने सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालय बेलवली या शाळेमध्ये मोफत वह्यावाटप करण्यात आले. हा कार्यक्रम पंचायत समितीचे माजी सदस्य नीलेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या वेळी वारदोली ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच शिल्पा पवार, सतीश पाटील, दिलीप पाटील व अन्य उपस्थित होते.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply