Breaking News

सरकारने एका जातीचा विचार केला, 85 टक्के जनतेचे काय?

प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना सवाल

मुंबई : प्रतिनिधी
एमपीएससी परीक्षांवर तोडगा काढता आला असता, मात्र ही परीक्षा रद्द करताना राज्य सरकारने एकाच जातीचा विचार केला आहे. उर्वरित 85 टक्के जनतेचे काय, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केला आहे.
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्यानंतर पोलीस भरती करू नये, नोकर भरतीसाठीच्या एमपीएससीसारख्या परीक्षा घेऊ नयेत, अशी मागणी मराठा संघटनांनी केली होती. त्यानंतर राज्य सरकारने एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारच्या या निर्णयावर प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मराठा आंदोलनकर्त्यांना राज्य सरकारने विश्वास दिला नाही. महाविकास आघाडी सरकार अतिरेक करीत आहे. महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारच्या दिशानिर्देशाची अंमलबजावणी करीत नाही. वारकरी संप्रदायाने सरकारच्या विरोधात आंदोलन केल्याने महाराष्ट्रामध्ये मंदिरे उघडी केली जात नाही. सरकार वारकर्‍यांना धडा शिकवण्याच्या तयारीत आहे असे दिसते. सरकार निष्फळ ठरले आहे. त्यामुळे आम्ही आंदोलन करीत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Check Also

उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …

Leave a Reply