उरण : वार्ताहर
महेश बालदी मित्र मंडळ वतीने उरण नगर परिषदेचे तीर्थरूप डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्राथमिक शाळा पेन्शनर्स पार्क येथे दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत झाला.
महेश बालदी मित्र मंडळ आयोजित दहीहंडी उरण शहरात लावण्यात आली होती त्यात उरण शहरसह ग्रामीण भागातून सुमारे 27 गोविंद पथकांनी हजेरी लाऊन सलामी दिली. दहीहंडी फोडण्याचा मान बोरी गावातील होणेश्वर गोविंदा पथकाने पटकविला. होणेश्वर गोविंदा पथक बोरी, राघोबा देव गोविंदा पथक कोट नाका, कोप्रोली गोविंदा पथक आदींनी सातव्या थरापर्यंत सलामी दिली. त्यांना आमदार महेश बालदी यांच्या हस्ते रोख रक्कम एकरा हजार व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
या वेळी माजी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, माजी उपनगराध्यक्ष जयविन कोळी, भाजप तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, सहाय्यक पोलीस आयुक्त (पोर्ट विभाग) धनंजय शिरसागर, उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील पाटील, भाजप तालुका सरचिटणीस सुनील पाटील, नगरसेवक नंदु लांबे, राजेश ठाकूर, नगरसेविका स्नेहल कासारे, प्रियंका पाटील, आशा शेलार, जानव्ही पंडीत, अल्पसंख्याक रायगड जिल्हा अध्यक्ष जसिम गॅस, उरण युवा अध्यक्ष निलेश पाटील, भाजप तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, शहर महिला अध्यक्ष संपूर्णा थळी, मदन कोळी, हितेश शाह, मनन पटेल, सुनील पेडणेकर, संतोष ओटावकर, सचिन वैद्य, मकरंद पोतदार, मनोहर सहतीया, मदन कोळी, हस्तीमल मेहता, सुरज ठवले, निखील माळी, देवा घरत, परेश वैवडे, रवींद्र कुलकर्णी, निवेदक नितेश पंडीत, गायक मोहन फुंडेकर, अजित भिंडे, सागर मोहिते, नवीन राजपाल, निलेश कदम व महेश बालदी मित्र मंडळ सदस्य आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन नितेश पंडीत यांनी केले तर प्रसिध्द गायक मोहन फुंडेकर यांनी स्त्री व पुरुषाच्या आवाजात श्री कृष्ण गोविंदा वरील गाणी गायिली.