कामोठे ः रामप्रहर वृत्त – कामोठे येथे मेट्रो केअर पॉलिटेक्निक अॅण्ड डायग्नॉस्टिक सेंटर नव्याने सुरू झाले आहे. या सेंटरचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 2) करण्यात आले.
कामोठे सेक्टर 10 येथे मेट्रो केअर पॉलिटेक्निक अॅण्ड डायग्नॉस्टिक सेंटरच्या उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पनवेल महापालिकेचे नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, विकास घरत, महाराष्ट्र बिल्डर असोसिएशन अध्यक्ष के. के. म्हात्रे, भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष अशोक मोटे, युवा मोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, युवा नेते हॅप्पी सिंग, राजेश गायकर, भाऊ भगत, भाजप नेते रवींद्र जोशी, रघुनाथ राठोड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.