Breaking News

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी खोपोली, खालापूरकर सरसावले

खोपोली ः प्रतिनिधी

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे महापूर आला. तेथील रहिवाशांचे पाण्यात सर्वस्व वाहून गेले. शासनाने या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील शिळफाटा, बाजारपेठ अशा विविध भागातून मदत फेरी काढण्यात आली. खोपोलीतील सर्वसामान्य नागरिक, दुकानदार ते मोठे व्यापारी यांनी भरभरून विविध वस्तूरूपात साहाय्य केले. लायन्स क्लब, रोटरी क्लब, इनरव्हील क्लब, लायन लेडी क्लब, शहरातील व्यापारी संघटना, पत्रकार आदींसह विविध संघटना, तसेच पालिका नियोजन सभापती तुकाराम साबळे, शिवसेना शहरप्रमुख सुनील पाटील, नगरसेवक अमोल जाधव, किशोर पानसरे, शिवसहकार सेनेचे हरीश काळे, शिक्षण मंडळाचे किशोर पाटील, सामाजिक कार्यकर्ते सचिन मोरे, रवी रोकडे यांसह विविध संघटनांचे कार्यकर्ते, अपघातग्रस्त मदत ग्रुप कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. या मदत फेरीचे नेतृत्व अपघातग्रस्त मदतीसाठी ग्रुपचे प्रमुख गुरू साठीलकर करीत होते. ते ध्वनिक्षेपकावरून प्रत्येक भागात मदतीसाठी आवाहन करीत होते. सायंकाळी तहसीलदार इरेश चप्पलवार हेही या रॅलीत सहभागी झाले. झोपडपट्टी भागातील रहिवाशांनीही उत्स्फूर्तपणे कपडे, भांडी व इतर वस्तू स्वरूपात मदत केली. त्यावरून नेहमीच खोपोली, खालापूरकर मदतीसाठी पुढे असतात हे दाखवून दिल्याचे गुरू साठीलकर यांनी सांगितले.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply