महाड : प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे नेते रघुवीर देशमुख यांच्यासह तेलेंगे मोहल्ल्यातील कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि. 16) शिवसेनेत प्रवेश केला.
राज्यातील अनेक काँग्रेस, राष्ट्रवादीमधील नेते भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करत आहेत. हे लोन आता महाडपर्यंत पोहोचले आहे. महाडमधील रघुवीर देशमुख यांनी शुक्रवारी आमदार भरत गोगावले यांच्या निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी तेलंगे मोहल्ल्यातील मेहबूब अ. रहिमान झटाम, फरहान अ. कादिरी झटाम, फवाद अ. कादिरी झटाम, मुजम्मीर अ. कादीर झटाम, खलील युसुफ अंतुले, शाहाब अकिल अंतुले, मुबशशीर अंतुले, तन्वीर अंतुले, मुदससीर अंतुले, नूर मोहम्मद अंतुले, फर्मान आंतुले, खाजा हसन अ. कादिरी अंतुले, गुलाम हाफिजअ.गफुर झटाम, आसोम गु. हाफिज झटाम, फैजान जाहिद हुसेन झटाम, तोसिफ जाहिद आदींनी शिवसेनेत प्रवेश केला.