Breaking News

कर्जतमध्ये अखंड भारत संकल्प दिन कार्यक्रम

कडाव : प्रतिनिधी

विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने कर्जतमधील अभिनव ज्ञान मंदिर शाळेच्या सभागृहात बुधवारी अखंड भारत संकल्प दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात संघाचे जिल्हा बौद्धिक प्रमुख विजय वेदपाठक यांनी अखंड भारत या विषयावर विस्तीर्ण व सविस्तर

मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाची सुरुवात भारतमाता पूजनाने झाली. विश्व हिंदू परिषदेचे कुलाबा जिल्हा अध्यक्ष दिनेश बोरसे यांनी प्रास्ताविक केले. प्रखंड उपाध्यक्ष विष्णू जोशी, सहसंयोजक विक्रमसिंग राजपूत, सेवा विभागाचे अनंत हजारे, गणेश जोशी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बजरंग दलाचे कुलाबा जिल्हा संयोजक साईनाथ श्रीखंडे यांनी केले. विश्व हिंदू परिषदेचे प्रखंड अध्यक्ष विनायक उपाध्ये, कुलाबा जिल्हा मंत्री रमेश मोगरे, कर्जतचे नगरसेवक बळवंत घुमरे, नगरसेविका स्वामिनी मांजरे, जिल्हा धर्मप्रसार विभागप्रमुख महेश बडेकर, अभिजित मराठे, ह.भ.प. दिलीप महाराज राणे, ह.भ.प. राहुल महाराज शिंदे, गायत्रीताई परांजपे, तानाजी भोईर, मिलिंद कोशे, महेश निघोचकर, नंदू मनेर, विराग मेढी, संजय दातार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. मनिषाताई ढुमणे यांनी आभार मानले. शांती मंत्र आणि घोषाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply