नवी दिल्ली ः अमेरिकेच्या तीन दिवसांच्या दौर्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (दि. 26) सकाळी भारतात परतले. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि इतरांनी दिल्ली विमानतळावर पंतप्रधान मोदींचे जंगी स्वागत केले. या वेळी कार्यकर्त्यांनी जयजयकाराच्या घोषणा दिल्या, तर पंतप्रधानांनी सर्वांचे आभार मानले. पंतप्रधान मोदींनी अमेरिका दौर्यात सलग अनेक बैठका घेतल्या. ते जवळपास 65 तास अमेरिकेत होते आणि या दरम्यान त्यांनी 20 बैठकांमध्ये उपस्थिती लावली, तसेच अमेरिकेला जाताना आणि परतताना पंतप्रधान मोदींनी विमानातही अधिकार्यांसोबत चार बैठका घेतल्या. राजधानी दिल्लीत पंतप्रधान मोदींचे समर्थक आणि कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत केले. स्वागतासाठी जोरदार तयारी करण्यात आली होती.
Check Also
खारघरमध्ये नाट्यगृह उभारणीकरिता भूखंड द्या
आमदार प्रशांत ठाकूर यांची सिडकोकडे आग्रही मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त एज्युकेशनल हब असलेल्या खारघरमध्ये …