Breaking News

दोन अपघातात दोन स्कुटीचालकांचा मृत्यू

पनवेल : वार्ताहर

सायन-पनवेल मार्ग व पामबीच मार्गावर झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोन स्कुटीचालकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दोन्ही घटनांचा अनुक्रमे सीबीडी आणि एपीएमसी पोलीस तपास करत आहेत.

सायन-पनवेल मार्गावरील सीबीडी येथील उड्डाणपुलावर घडलेल्या पहिल्या अपघातात नवीन माझी (36) या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. खारघर सेक्टर-8 मधील गुडवील गार्डन इमारतीत राहणारा नवीन माझी हा आपल्या डिओ स्कुटीवरून वाशीहून खारघर येथे जात होता. त्याची स्कुटी सीबीडी येथील उड्डाणपुलावर आली असताना अज्ञात वाहनाने त्याच्या स्कुटीला जोरदार धडक दिली. यात नवीन माझी हा खाली पडून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो काही वेळात मरण पावला. या घटनेची माहिती मिळताच सीबीडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याचा मृतदेह रुग्णालयात पाठवून दिला. सीबीडी पोलिसांनी या घटनेतील अज्ञात वाहन चालकाचा शोध सुरू केला आहे. या अपघातानंतर वाशी येथे पामबीच मार्गावर घडलेल्या दुसर्‍या अपघातात सचिन विठ्ठल रोडे (40) या व्यक्तीचा मृत्यू झाला. वाशी सेक्टर-17 मधील नवत्म सोसायटीत राहणारा सचिन हा कोपरी गाव येथून डिओ स्कुटीवरून पामबीच मार्गे वाशी सेक्टर-17 मध्ये येत होता. सत्रा प्लाझा इमारतीजवळ त्याची स्कुटी रस्ता दुभाजकाला घासली गेल्याने खाली पडला. याच वेळी पाठीमागून भरधाव वेगाने येणार्‍या ट्रव्हॅल्स बसची सचिनला जोरदार धडक लागली. यात तो गंभीर जखमी होऊन जागीच मरण पावला. या घटनेनंतर ट्रॅव्हल्स बसचालक पळून गेला असून एपीएमसी पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply