Breaking News

कातळी पळचिल रस्ता वाहतुकीसाठी खुला ; रायगड व रत्नागिरी सीमेवरील वाद मिटला

पोलादपूर : प्रतिनिधी

तालुक्यातील कातळी ते पळचिल या मार्गावरील अडथळा दूर करण्यात पोलीस आणि महसूल प्रशासनाला यश आल्याने आता या मार्गावरील एसटी वाहतूक सुरळीत होणार आहे. पोलादपूर तहसिलदार प्राजक्ता घोरपडे आणि सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रशांत जाधव यांच्या प्रयत्नामुळे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागातील या रस्त्यासंदर्भातील वाद आता कायमचा संपुष्टात आला आहे.

रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागातील कातळी ते पळचिल या रस्त्याचा वाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होता. कशेडी टॅप पोलीस चौकीच्या समोरील या रस्त्याच्या डाव्या बाजूची घरे रायगड जिल्ह्याच्या हद्दीत असून उजव्या हाताच्या घरांचा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये समावेश होतो. या रस्त्यावरून पळचिल, गोलदरा, तामसडे, महालगूर भागात जाणार्‍या वाहनांना रायगड हद्दीतील घरांच्या कम्पाऊंड वॉलचा अडथळा होत असल्याने अलिकडेच येथून पळचिलकडे जाणार्‍या एसटी गाड्या बंद झाल्या होत्या.पोलादपूरच्या तहसिलदार प्राजक्ता घोरपडे यांनी नायब तहसिलदार समीर देसाई, सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रशांत जाधव, पोलीस पाटील आनंद निविलकर यांच्यासह ग्रामस्थांच्या उपस्थितीत या रस्त्यावरील वादग्रस्त अतिक्रमण असलेली कम्पाऊंड वॉल जेसीबीद्वारे भुईसपाट करून हा वाद कायमचा दूर केला. परिणामी या रस्त्यावरून बंद झालेली एसटी बसच्या फेर्‍या पूर्ववत सुरू होऊन येथून ये-जा करणार्‍या वाहनांना दिलासा मिळाला आहे.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply