Breaking News

विनाकारण फिरणार्‍यांना उठाबशा काढण्याची शिक्षा

पेण पोलिसांनी घडविली अद्दल

पेण : प्रतिनिधी
संचारबंदीतही विनाकारण फिरणार्‍या 22 ते 25 जणांना पेण पोलिसांनी उठाबशा काढणे व काही वेळ रस्त्यात बसण्याची शिक्षा दिली.
कोरोनामुळे बाजारात गर्दी न करण्याचे तसेच विनाकारण न फिरण्याचे आवाहन पेण पोलीस सातत्याने करीत आहेत. तरीही काही तरी निमित्त काढून घराबाहेर पडणार्‍यांचे प्रमाण वाढल्याने पोलिसांनी कारवाईस सुरुवात केली आहे. पेणमध्ये अशाच प्रकारे विनाकारण फिरणार्‍यांना थांबवून त्यांना मुख्य चौकात उठाबशा काढण्याची व काही वेळ बसण्याची शिक्षा देण्यात आली.

Check Also

नमो चषक अंतर्गत कामोठ्यात रस्सीखेच स्पर्धा : नाव नोंदणीची 5 फेब्रुवारी अंतिम तारीख

पनवेल ः रामप्रहर वृत्तभारतीय जनता युवा मोर्चा पनवेलच्या वतीने भव्य क्रीडा महोत्सव अर्थात नमो चषक …

Leave a Reply