Breaking News

खोपोलीत पिसाळलेल्या वळूची दहशत

खालापूर : प्रतिनिधी

खोपोलीत सध्या मुक्याप्राण्यांची दहशत निर्माण झाली आहे.  शहरातील सोमजाईवाडी मागील आठवड्यात दोन पिसाळलेल्या कुत्र्याने तीन लहान मुलांचा चावा घेऊन जखमी केल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी (दि. 11) सकाळी वळू (बैल)ने 75 वर्षांच्या आजीबाईंसह विद्यार्थी व नागरिकांना जखमी केले. प्राथमिक उपचार करून या जखमींना घरी सोडण्यात आले.

खोपोली बाजारपेठेत पिसाळलेला वळूने मंगळवारी दोघा जणांंना धडक देवून जखमी केले होते. तर बुधवारी सकाळी 75 वर्षाच्या आजीबाई व दुचाकीवरून जाणार्‍या खालापुरातील पत्रकार व त्याच्या मुलाला धडक देत जखमी केले. त्यामुळे शहरातील बाजारपेठ, आरडीनगर व खोपोली रेल्वे स्थानक परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. खोपोली नगर परिषदेच्या अग्निशमन दलाचे प्रमुख मोहन  मोरे, त्यांचे सहकारी कर्मचारी संतोष पवार, तुकाराम निरगुडा, अरविंद जाधव व सामाजिक कार्यकर्त्यांनी मोकळ्या मैदानात या वळूला ताब्यात घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले मात्र सापडत नव्हता.  दरम्यान, मोकाट जनावरे पकडण्यात तरबेज असलेले विठ्ठल मोहिते (रा. सांगली) खोपोलीत पाहुणे म्हणून आले आहेत. त्यांच्या अनुभवाचा फायदा घेत वळूला सापळ्यात जेरबंद करण्यात आले व नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला. मात्र काही वेळातच या वळूने दम सोडला.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply