Breaking News

अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्यांसह खाऊचे वाटप

सीकेटी विद्यालयाचे अनोखे दातृत्व

पनवेल ः रामप्रहर वृत्त

पनवेल तालुक्यातील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयाच्या इंग्लिश मीडियम प्राथमिक विभागाच्या माध्यमातून शनिवारी (दि. 7) अनाथ मुलांना शालेय साहित्य, कपडे व खाऊचे वाटप मुख्याध्यापिका उज्ज्वला कोटीयन यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यालयाच्या या दातृत्वाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

सीकेटी विद्यालयाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत असून, त्यातीलच हा एक अनोखा उपक्रम शनिवारी राबविण्यात आला. या वेळी पनवेल खांदा कॉलनीतील बालग्राम अनाथाश्रमातील मुलांना वह्या, पेन, कंपास, स्कूल बॅग, चप्पल, बूट, पेन अशा प्रकारचे शैक्षणिक साहित्य, विविध प्रकारचे कपडे, खाऊचे वाटप करण्यात आले. या भेटवस्तू देण्यासाठी विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनीही खारीचा वाटा उचलत हातभार लावला. त्यामुळे हा कार्यक्रम यशस्वीरित्या सीकेटी विद्यालयात झाला.

 या वेळी बालग्राम अनाथाश्रमातील विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी म्हणून काही विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. सर्वांच्या वतीने त्यांनी या भेटवस्तूंचा स्वीकार केला. तसेच त्यांनी सीकेटी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कोटीयन व त्यांच्या सर्व शिक्षक सहकार्यांचे आभार मानले.

या कार्यक्रमास मार्गदर्शन करताना मुख्याध्यापिका कोटीयन यांनी, अनाथ व गरीब विद्यार्थ्यांच्या आयुष्यात प्रेमाचा आणि आनंदाचा प्रकाश

पसरवण्यासाठी एक सामाजिक बांधीलकी म्हणून शाळा सदैव एक पाऊल पुढे राहील, अशी ग्वाही दिली.  यावेळी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply