Wednesday , February 8 2023
Breaking News

बीसीटी विद्यालयात वार्षिक क्रीडा स्पर्धा

निरोगी शरीरासाठी खेळाबरोबरच व्यायामाची कास धरा -चंद्रकांत घरत

उरण : रामप्रहर वृत्त

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उरण तालुक्यातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी उरण द्रोणागिरी नोड परिसरात भागूबाई चांगू ठाकूर (बीसीटी) विद्यालयाची स्थापना केली. या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक, क्रीडा स्पर्धांमध्ये तालुका व जिल्हास्तरावर यश संपादित केले आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी खेळाबरोबरच व्यायामाची कास धरणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन बीसीटी विद्यालयाचे चेअरमन चंद्रकांत घरत यांनी केले.

बीसीटी विद्यालय येथे वार्षिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन बुधवारी (दि. 11) करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटनाच्या वेळी घरत बोलत होते. या वेळी विद्यालयाच्या प्राचार्य अनुराधा काटे, पूनम पाटील, मोना पाटील, रूपाली खेडेकर, किशोर पाटील, विद्यालयाचे सभासद शेखर तांडेल, सुनील पाटील, सत्यवान भगत यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.

बीसीटी विद्यालयातील आस्था प्रताप मोकाशी व सारा विजय भगत या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविल्याने व विद्यालयाचे नाव उंचावल्याने प्राचार्य, शिक्षक, सभासद यांनी त्यांचा या कार्यक्रमाचे औचित्य साधून विशेष सन्मान करण्यात आला.

Check Also

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण

पनवेल : वार्ताहर परमपूज्य स्वामी अक्षयानंद सरस्वती महाराज यांच्या प्रेरणेने अक्षयधाम मंदिराचा आठवा वर्धापन दिन …

Leave a Reply