Breaking News

महात्मा फुले महाविद्यालयात चर्चासत्र

पनवेल : रामप्रहर वृत्त

रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये अर्थशास्त्र व वाणिज्य विभागामार्फत अर्थशास्त्र, वाणिज्य व व्यवस्थापनातील नवीन विचार प्रवाह या विषयावरील एक दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्र झाले.

यासाठी दक्षिण आफ्रिका येथील नॉर्थवेस्ट युनिव्हर्सिटीई मधील प्रा. डॉ. रेना रविंदर यांना चर्चासत्राचे बीजभाषण करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.  या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी एच. के. एस. इम्पेक्स प्रा. लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापक विजय लोखंडे व प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे येथील मंजुनाथ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एस. अडिगल उपस्थित होते.

चर्चासत्राच्या सुरुवातीस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर यांनी उपथित मान्यवरांचे स्वागत करून चर्चासत्राचे प्रास्ताविक केले. चर्चासत्रामध्ये देश व राज्यभरातील तज्ज्ञ व्यक्तींनी आपली उपस्थिती दर्शवित आपले शोध निबंध सादर केले. संपूर्ण दिवसभर चाललेल्या  चर्चासत्रामध्ये देश विदेशातील अर्थव्यवस्था व व्यवस्थापन या वर सांगोपांग चर्चा करण्यात आली. आफ्रिकेतील प्रा. डॉ. रेन रविंदर यांनी आफ्रिका व भारत या दोन देशामधील अर्थव्यवस्थेमधील समान दुव्यांवर भाष्य करीत देशाच्या  विकासाचे मार्ग प्रस्तुत केले. एकूण तीन सत्रांमध्ये चाललेल्या या परिसंवादामध्ये डॉ. अदिती अभ्यंकर, डॉ. एलिझाबेथ मॅथ्यूज, डॉ. साहेबराव ओहाळ , डॉ. तेजल  गाडे, डॉ. आर कृष्णन, डॉ. निलेश कोळी, डॉ. प्रकाश सावंत , डॉ. रिंकू शंतनू आदी व्यक्तींनी आपले विचा शोधनिबंधाच्या माध्यमातून मांडले.   चर्चासत्राचे संयोजक महाविद्यालयाचे उप प्राचार्य डॉ. ए. डी आढाव व डॉ. नरेश मढवी यांनी उपास्थित पाहुण्यांचे स्वागत करीत चर्चासत्र यशस्वी करणेसाठी परिश्रम घेतले. आभार  प्रा डॉ. उलवेकर, प्रा. सोपान गोवे तसेच प्रा. आर. एस. जमनूके यांनी मानले. प्रा. डॉ.लीना मेश्राम प्रा. अवचिते 

यांनी सूत्रसंचालन केले.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply