पनवेल : शिवशक्ती क्रिकेट क्लब माणघर यांच्या वतीने प्रकाश झोतातील क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. हे क्रिकेट सामने 23 ते 25 डिसेंबर दरम्यान कैलासवासी मधुकर शंकर पाटील मैदानात सुरु होते. या क्रिकेट सामन्यांना सभागृह नेते परेश ठाकूर यांनी बुधवारी भेट देऊन खेळाडूंना प्रोत्साहीत केले. या वेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, उपसरपंच अशोक पाटील, दिनेश पाटील, बाबा शहा, महेंद्र पाटील, महेश म्हात्रे आदी उपस्थित होते.