पनवेल : प्रतिनिधी
कामोठे येथील कल की छाया या संस्थेतील मुलांसाठी दिशा महिला मंचतर्फे बुधवारी (दि. 25) ख्रिसमस नाताळ आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने डान्स म्युझिक मस्ती अशा प्रकारच्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने या मुलांना साधी चप्पलसुद्धा खरेदी करता येत नाही. आलेल्या परिस्थितीचा सामना करत जिद्दीने शिकण्यासाठी ही मुले एकही दिवस शाळा चुकवत नाहीत. ही अनवाणी चालणारी छोटी पावले पाहून दिशा महिला मंचच्या हिरकणींनी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो तसेच माणुसकी या भावनेतून मदतीचा हात पुढे करत संस्थेतील 60 मुलांना नवीन चप्पल देण्याचा सामाजिक उपक्रम हाती घेतला. दिशा महिला मंचच्या विद्या मोहिते, जयश्री झा, रेखा ठाकूर, रीना पनवर, भावना सरदेसाई, विमल बिडवे, खुशी सावर्डेकर, स्वप्नाली दोषी, उषा डुकरे, गीतांजली, सायली रेडेकर, अश्विनी नलावडे, दीपाली खरात, योजना दिवटे, अर्चना जगताप, रूपा जाधव, श्रुती शिंदे, रुपाली होगडे, पियुषा आदी हिरकणींचे मोलाचे सहकार्य लाभले. दिशा महिला मंचच्या संस्थापिका निलिमा आंधळे यांनी सर्व हिरकणींचे आभार मानले.