Breaking News

म्हसळ्यात खैराच्या लाकडांची वाहतूक करणारा टेम्पो जप्त

चालक जेरबंद; कणघर फाटा येथे वन विभागाची कामगिरी

म्हसळा : प्रातिनिधी

वन विभागाच्या पथकाने शुक्रवारी (दि. 5) श्रीवर्धन-म्हसळा-गोरेगांव या राज्यमार्गावरील कणघर फाटा येथे खैराच्या लाकडांची चोराटी वाहतूक करणारा टेम्पो ताब्यात घेतला असून, त्याच्या चालकाला अटक केली आहे.

म्हसळा तालुक्यात वनविभागाचे क्षेत्र मोठ आहे,  या क्षेत्रात फार जुनी खैराची लागवड करण्यात आली होती. अलिकडच्या काळात तालुक्यातून खैराच्या लाकडांची मोठ्या प्रमाणात चोरटी तोड आणि वाहतूक होत असल्याचे परिक्षेत्र वन आधिकारी संजय पांढरकामे यांच्या लक्षात येताच त्यांनी पूर्ण तालुक्यात ‘ऑपरेशन खैर‘ सुरु केले आहे. त्यानुसार शुक्रवारी वनपाल दीपक शिंदे (मांदाटणे), वनरक्षक प्रियंका चव्हाण (खामगाव)वनरक्षक अमोल सोनार यांच्या पथकाला श्रीवर्धन- म्हसळा- गोरेगांव राज्य मार्गावरील कणघर फाटा येथे महिंद्रा पिकअप टेम्पो (एमएच-02,वायए-3689) अवैध खैर तस्करी करताना सापडला. त्याचवेळी अन्य एका गस्ती पाँईटवरून परिक्षेत्र वन आधिकारी संजय पांढरकामे, लक्ष्मण इंगोले, अतुल आहिरे, सतीश खरात, भिमराव सुर्यतळ यांचे पथक घटनास्थळी पोहचले. त्यांनी टेम्पो चालक फरान दाऊद चिलवान (रा. लिपणी वावे, ता. म्हसळा) याला ताब्यात घेऊन टेम्पोमधील सुमारे 6309रुपये किमतीचे खैराचे 146 सोलीव नग जप्त करून देहेन विक्री आगार येथे जमा केले व टेम्पो जप्त केला.

आरोपी फरान दाऊद चिलवान याला श्रीवर्धन न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसाची  पोलीस कोठडी मिळाली.

खैराच्या झाडाच्या अतिजून, लालसर मध्यकाष्ठापासून पाण्यात उकळवून काढलेल्या पदार्थास कात (काथ) म्हणतात. मुखविकार, डायरिया यावर औषध म्हणून कात वापरतात. तसेच तोंडाला चव आणण्यासाठी, पचनक्रिया, दाताचे तसेच त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी काताचा वापर करतात. अतिसार, आमांश, पोटात दुखणे इत्यादींसाठी काताची पूड अणि मध घेतात. अधिक वेळा लघवी होत असल्यास कातपूड वापरतात. काताचा उपयोग जखम लवकर भरून होण्यासाठी होतो.

-महमद अली उर्फ भाई दफेदार, आयुर्वेद अभ्यासक, म्हसळा

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply