कर्जत, खोपोली, खालापूर ः प्रतिनिधी
जोरदार पावसामुळे कर्जत आणि खोपोलीत पाणी शिरले होते. नेरळजवळील दामत येथे पुलाजवळ माय-लेक वाहून गेले आहेत.
ढगफुटीसदृश पाऊस पडल्याने कर्जत तालुका जलमय झाल्याचे दिसून आले. शहरातील अनेक भागांत आणि उल्हास नदीच्या तीरावर असलेल्या गावांत पुराचे पाणी शिरले होते. कर्जत-कल्याण राज्यमार्गावर दामत येथे इब्राहिम मुनियार (वय 46) आणि झोया इब्राहिम मुनियार (वय 6) हे दोघे माय-लेक गुरुवारी रात्री 2च्या सुमारास पुराच्या पाण्यात वाहून गेले.
खोपोली शहरातही अनेक सखल भागांत पाणी साचले होते. रेल्वेरूळाखालील मातीचा भराव वाहून गेल्याने खोपोली-कर्जत रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. रस्ते वाहतुकीवरही पावसाचा परिणाम जाणवला.
Check Also
वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …
RamPrahar – The Panvel Daily Paper