Breaking News

भाजप ओबीसी मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी सचिन मोरे

पनवेल : रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चाच्या रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी खोपोली येथील सचिन मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबद्दल रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, सिडकोचे अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांचे अभिनंदन केले. 

मोरे हे राजकीय व सामाजिक कार्यात सक्रियपणे कार्यरत आहेत. रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असलेला ओबीसी समाज भाजपशी अधिकाधिक जोडला जावा, याकरिता आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मान्यतेने ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ देशेकर यांनी मोरे यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे.

सचिन मोरे ओबीसी समाजाचा सर्वांगीण विकास साधत पक्ष अधिकाधिक बळकट करण्यासाठी यापुढेही सतत प्रयत्नशील राहतील, असा विश्वास देशेकर यांनी व्यक्त केला आहे.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply