Breaking News

नागरिकांनी सुरक्षितता बाळगावी; नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांचे आवाहन आ. रविशेठ पाटील यांच्या हस्ते अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप

पेण ः प्रतिनिधी

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेबरोबरच सुरक्षितता बाळगणेही महत्त्वाचे असल्याचे नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी सांगितले. कोरोनाविरुद्ध रोगप्रतिकारशक्ती वाढावी म्हणून आयुष मंत्रालयाने दिलेल्या सूचनेनुसार पेण नगर परिषदेच्या माध्यमातून नागरिकांना अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी नगराध्यक्षा प्रीतम पाटील बोलत होत्या.

या वेळी उपनगराध्यक्ष वैशाली कडू, सभापती राजेश म्हात्रे, नगरसेवक प्रशांत ओक, दीपक गुरव, नगरसेविका शेहनाज मुजावर, नलिनी पवार, अश्विनी शहा, ममता लांगी, अर्पिता कुंभार, मुख्याधिकारी अर्चना दिवे, आरोग्य अधिकारी शिवाजी चव्हाण तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते अण्णा कडू उपस्थित होते.

शहराबाहेरील व्यक्ती आल्यास त्यांनी स्वतः विलगीकरणात राहणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांना नगरपालिका सर्वतोपरी सहकार्य करेल. अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे पेण शहरातील सर्व 10 प्रभागांत वाटप करण्यात येणार असल्याचे सांगून कोरोनाचे युद्ध जिंकून आपली व आपल्या शहराची सुरक्षा करण्याचे आवाहन नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी या वेळी केले.जगाला थांबविणार्‍या कोरोनाला दूर ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती होणे गरजेचे असल्याचे आमदार रविशेठ पाटील यांनी या वेळी सांगितले. अर्सेनिक अल्बम गोळ्या रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त आहेत. शहरातील नागरिकांना या गोळ्यांचा नक्कीच फायदा होईल. मुंबई, पुणे तसेच इतर मोठ्या शहरांतून येणार्‍या लोकांपासून हा रोग पसरण्याची जास्त शक्यता आहे. त्याबाबत नगरपालिकेनेही काळजी घेतली पाहिजे, असेही आमदार रविशेठ पाटील यांनी सांगितले.

Check Also

खारघरमध्ये गुरू तेग बहादुर यांच्या शहिदी समागमाला प्रारंभ; विविध कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे ‘हिंद दी …

Leave a Reply